Friday, 6 May 2016

bhalchandra nemade, hindu , kadambari , marathi


भालचंद्र नेमाडे यांची ‘झूल’ ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर तब्बल तीस

 वर्षांनंतर ‘हिंदू’ ही कादंबरी प्रकाशित झाली. एवढा दीर्घ लेखनकाळ असलेली


 ही मराठी साहित्यातील अपवादात्मक आणि तेवढीच बहुचर्चित कादंबरी आहे

. पुरातत्त्वविदयेचा अभ्यासक व संशोधक खंडेराव हा कादंबरीचा नायक

 आहे, त्याच्या भूमिकेतून नेमाडे हिंदू संस्कृतीविषयक आपली वैचारिकता

 मांडतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दोन धर्मांवरून झालेली भारताची फाळणी,

 मोरगाववर पेंढार्‍यांची चाल व लूटालूट, लभानी लोकांचे मोरगावात समरस 

होणे, मारवाडी समाजासारख्या समाजाचे आपला मूळ प्रदेश सोडून अन्यत्र

 सामावून जाणे इत्यादींचे वेधक चित्रण या कादंबरीत येते..हिंदू समाजात

 अडगळ होऊन बसलेल्या अनिष्ट व्यवस्था व चालीरीती यांचे विविध अंगांनी

 कादंबरीत चित्रण येते. आपल्या समाजात, कुटुंब व्यवस्थेत स्त्रियांवर होणारा

 अन्याय, त्यांना भोगावे लागणारे दु:ख हे नेमाडेंच्या सगळयाच

 कादंबर्‍यांमधून येणारे आशयसूत्र आहे. सगळया समाजाच्या अंत:स्तरावरच्या 

सगळया जाणिवा नेमाडे या कादंबरीतून व्यक्त करतात, वाचकाला

 टोचण्या देतात, अस्वस्थ करतात, अंतर्मुख होऊन विचार करायला भाग

 पाडतात.


No comments:

Post a Comment