शिरवाडकर यांचे सर्वांत गाजलेले नाटक, या नाटकाने इतिहास निर्माण केला.
आजही प्रत्येक कलाकाराला हे नाटक एक आव्हान वाटतं. या नाटकासाठी
शिरवाडकरांना साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला. नटसम्राट गणपतराव
बेलवलकर या माणसाची ही शोकात्मिका आहे. एके काळी नट म्हणून रंगभूमी
गाजवलेले गणपतराव आपली सर्व मालमत्ता मुलांमध्ये वाटून टाकतात आणि
ऐन वार्धक्यात निराधार होतात, हक्काची मुलंही विचारेनाशी होतात.
वृध्दावस्थेतील एकाकीपणा हा या नाटकातील केंद्रवर्ती आशय असला तरी
अत्यंत उत्कट वृत्तीच्या संवेदनाक्षम माणसाला भोवतीच्या व्यवहारी जगातले
सांकेतिक जगणे जगता येत नाही. ‘कोणीही कोणाचे नसते’ हा विच्छिन्न
करणारा जीवनार्थ या नाटकाला प्राप्त होतो. अत्यंत प्रभावी स्वगते, भावनेला
आव्हान करणारी शब्दकळा, आप्पा आणि कावेरी यांची परिणामकारक
व्यक्तिचित्रे यांमुळे हे नाटक प्रभावी ठरले. ‘नटसम्राट’ हे नाटक म्हणजे मराठी
रंगभूमीला शिरवाडकरांनी दिलेले हे एक अजरामर रत्न आहे.
No comments:
Post a Comment