Summary of the Book
अर्थशात्र, संगीत, साहित्य, राजकारण, समाजशास्त्र आणि कम्प्युटरसारख्या क्षेत्रात सहजपणे मुशाफिरी करणारे अच्युत गोडबोले यांच्या कारकिर्दीचा वेध त्यांनी या पुस्तकात घेतला आहे. गोडबोले यांनी अनेक विषयांचा सखोल अभ्यास करून तो वाचकांसाठी पुस्तकरूपाने सदर केला आहे. सोलापूरमधील शाळेपासून आयआयटीपर्यंत आणि आदिवासी भागापासून ते अमेरिकेतील आयटी क्षेत्रापर्यंतचा त्यांचा पल्ला पुस्तकात प्रत्ययास येतो.
एकीकडे बेकारी, गरिबी,जातीव्यवस्था, कॉ. डांगे, चळवळ, झोपडपट्टी तर दुसरीकडे आयबीएम, पटणी, सिंटेल, अमेरिका, चीनी व्यावसायिक आशा अनेक विषयांमध्ये त्यांनी केलेल्या मुशाफिरीचा आलेख पुस्तकात वाचायला मिळतो. गोडबोले यांच्या विचारांना बुद्धिमत्ता, उर्जा आणि चिंतनाची जोड मिळाली आहे. त्यामुळे पुस्तक एकाच वेळा माहितीपूर्ण आणि सकारात्मक जगण्याचे मंत्र देणारे ठरले आहे.

No comments:
Post a Comment