Summary of the Book
श्रीमंत बाजीराव पेशवा आणि मस्तानी यांचे पुत्र समशेरबहाद्दर याच्या जीवनावर आधारित नयनतारा देसाई यांची ही कादंबरी आहे. समशेर अत्यंत बुद्धिमान आणि पराक्रमी होता; परंतू मस्तानी मुसलमान असल्यामुळे त्याला शनिवारवाड्यावर खूप त्रास सहन करावा लागला. बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई, पुत्र नानासाहेब आणि बंधू आप्पासाहेब त्याच्यावर नाराज होते.
मात्र, बाजीरावाच्या पत्नी काशीबाई यांनी समशेरचा प्रेमाने सांभाळ केला. समशेरचे 'कृष्णसिंग' असे नामकरण काशीबाईंनीच केले होते. पुढे समशेरवर सोपविलेल्या लढायांमध्येही त्याने पराक्रमी कामगिरी केली. तरीही आयुष्यभर त्याला तिरस्काराला सामोरे जावे लागले. 'आम्हास पेशवाई नको. या देहात जान असेपर्यंत आम्ही या मराठी राज्याचे संरक्षण करण्याकरता, लढणार आहोत,' असे चोख उत्तर त्याने आपला तिरस्कार करणाऱ्यांना दिले होते. हा सर्व इतिहास पुस्तकात वाचायला मिळतो.

No comments:
Post a Comment