द. मा. मिरासदार यांच्या निवडक कथा. मराठीतले प्रसिद्ध विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांच्या खास विनोदी शैलीतल्या निवडक कथांचा अत्यंत सुरस संग्रह म्हणजे मिरासदारी हे पुस्तक. गेल्या काही वर्षांत मराठी ग्रामीण कथेच्या उदयाबरोबर ग्रामीण वातावरणाशी संलग्न असणारी हास्यजनक कथा जन्माला आली. तिच्यात वृत्तीची विविधता आहे, केवळ एकसुरीपणा नाही. मिरासदारांच्या या कथांतून एक अनोखी मिश्किलपणाची, चमत्कृतीपूर्ण वळणांची व गमतीदार विक्षिप्तपणाची झाक वाचकाला अतिशय भावेल.
"मी मिरासदारांकडून अपेक्षा करतो ती प्रदीर्घ उपहासकथेची नव्हे, तर विनोदी कादंबरीची. त्यांच्या प्रतिभेची सहजप्रवृत्ती उपहासापेक्षा विनोदाकडेच अधिक आहे. व्यक्तिविशेष, आणि प्रसंगविशेष ह्यामधील हास्यबीजे नेमकी ओळखण्याची व खुलवण्याची जशी त्यांच्या ठिकाणी शक्ती आहे तशीच चेहर्यावरचे उसने गांभीर्य थोडेही ढळू न देता असल्या व्यक्तिप्रसंगातून जन्मलेल्या एखाद्या हास्योत्पादक घटनापरिस्थितीचे मिस्किल निवेदन रंगवण्याची त्यांच्या ठिकाणी एवढी अपूर्व शक्ती आहे की उपहासाचा ताण भासू न देणार्या विशुद्ध हास्याची एकसारखी निर्मिती साधणारी प्रदीर्घ कथा ते लिहू शकतील असे अगदी राहून राहून वाटते."
--- वा. ल. कुलकर्णी

No comments:
Post a Comment