Monday, 18 April 2016

GANDHALI, RANJIT DESAI, KATHA SANGRAH

Summary of the Book
ऐतिहासिक व्यक्तींवर लेखन करताना देसाईंच्या लेखणीला विशेष बहर आला आहे. गंधालीतील कथाही अशाच व्यक्तींवर, प्रसंगांवर आधारित आहेत. वाचकांची अभिरूची लक्षात घेऊन ऐतिहासिक व्यक्ती विषयी त्यांनी केलेले कलात्मक पातळीवरचे भाष्य, त्यातील प्रामाणिकपणा आणि त्यामागची तळमळ या कथातून जाणवते.

स्वप्नवत वातावरण, करूण, शोकात्म शेवट यानं या कथा वाचकाला भारावून टाकतात देशप्रेम, कलामूल्य अशा गोष्टींसाठी जीवन उधळून देणारी आगळी ठसठशीत व्यक्तीचित्रे यामुळे कथा व कथानायक वाचकाच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतात.
मनाला उदात्ततेची, शौर्याची जाणीव करून देणारे. व्यक्तीचित्रण, विषयांची निवड करण्याचे कौशल्य आणि मनाला गुंग करण्याचा एकूण परिणाम घडवणारे भाषासामर्थ्य यामुळे "गंधाली’ वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे.

No comments:

Post a Comment