जसे 'तुमची गोष्ट' आरंभीच लेखक सांगतो, "ही तुमची गोष्ट आहे म्हणजे तुमच्याही बाबतीत घडू शकेल अशी" आणि शेवटीही निक्षून सांगतो, "तुमची म्हणून सांगितलेली ही गोष्ट तुमची नव्हेच. एक आपली शक्यता सांगितलेली एवढेच". पण तरीही या कथेत ज्या थरारक अनुभवांचे निवेदन आहे, त्याचा प्रभाव इतका विलक्षण आहे की अपराधाचा स्पर्श तुमच्या मनीमानसी नसूनही तुमच्या गळ्याभोवती फासाचा स्पर्श झाल्याची भावना तुम्ही अनुभवता.
रत्नाकर मतकरी हे एक सिद्धहस्त कथाकार आहेत आणि या कथासंग्रहातील कथा मराठी भाषेत तरी दुर्मिळ अशा आहेत. या कथांचे अन्य भाषांतून अनुवाद झाले तर ते फक्त मतकरींचेच प्राप्त यश वृद्धिगंत करतील असे नव्हे, तर परिणामी मराठी भाषेलाही ललामभूत ठरतील.
No comments:
Post a Comment