Monday, 18 April 2016

PAWANKHIND, RANJIT DESAI, KADAMBARI

Summary of the Book
पावनखिंड ही रणजित देसाई यांची शेवटची ऐतिहासिक कादंबरी.

1960 नंतरच्या ऐतिहासिक कादंबरीच्या परंपरेतील वेगळ्या प्रकारची कादंबरी लिहिण्याचा हेतू मनात धरून देसाईंनी ही कादंबरी लिहिली. बाजीप्रभू देशपांडेंनी प्राण पणाला लावून घोडखिंड लढवली आणि राजांचे प्राण वाचले. बाजीने स्वराज्यासाठी आपल्या निष्ठा आणि पराक्रमाच्या सहाय्याने खिंडीची पावनखिंड बनवली. बाजीच्या देदिप्यमान देशभक्तीचे, अतुलनीय शौर्याचे, वीरश्रीपूर्ण चित्रण या कादंबरीत आढळते.

या कादंबरीतील स्थळांचे, गडांच्या परिसरातील धामधुमीचे, लढायांचे, जय-पराजयाच्या निमित्ताने पहावयास मिळणार्‍या आशा-निराशांचे चित्रण योग्य वातावरणनिर्मिती करते. या पार्श्वभूमीवर बाजीप्रभूंच्या वीरमरणाचे करुणरसपूर्ण वर्णन कादंबरीची रसक्ता आणि भावपूर्णता वाढवत नेते.

वाक्‌प्रचार, म्हणी, स्वगत आणि सूचक व नाट्यपूर्ण अर्थाने भरलेले संवाद हे या पुस्तकाचे विशेष जाणवणारे वैशिष्ट्य.

शिवशाहीतील पराक्रमी पुरूषावर लिहिली गेलेली मराठीतील ही पहिली कादंबरी.

No comments:

Post a Comment