"उत्तम भाषांतर किंवा अनुवाद हे येरागबाळाचे काम नव्हे हे खरेच आहे. पण रूपांतर हा त्याहीपेक्षा आणखी अवघड उद्योग. मूळ कलाकृतीतील वातावरण, व्यक्तीचे स्वभावविशेष, घटना, निवदनशैली आणि या सर्वांना सुसूत्र बांधणारे लेखकाचे व्यक्तिमत्व या सर्व भानगडी रूपांतरात टिकणे महाकठीण. एक धरावे तर दुसरे निसटते. दुसरे पकडावे तर तिसरे गडप होते. फार चमत्कारिक अनुभव. इतकेही करून कुठेतरी काहीतरी रहातेच. गच्च बसवलेल्या टोपीच्या आतून हॅटचे टोक लोंबताना कुणकुणला दिसते. एखाद्याच्या पायात सफाईने जरी चपला अडकवल्या तरी हे खरे बूटमोज्याचे पाय, हे सुप्रसिद्ध, चाणाक्ष्य वाचक पटकन ओळखतो. मग सगळी गंमत निघून जाते.
जेरोम के जेरोम यांच्या "थ्री मेन इन ए बोट" या गाजलेल्या पुस्तकाचे हे रूपांतर."
प्रस्तावनेतून
जेरोम के जेरोम यांच्या "थ्री मेन इन ए बोट" या गाजलेल्या पुस्तकाचे हे रूपांतर."
प्रस्तावनेतून
No comments:
Post a Comment