Monday, 18 April 2016

बाबुलमोरा , babulmora, ranjit desai, katha sangrah

ऐतिहासिक व सरंजामशाही वातावरणाला साजेशी खानदानी डौलदार ललितरम्य भाषाशैली, रोमँटिक प्रतिमासृ, आखीव रेखीव नाट्यपूर्ण कथानक. या वैशिष्ठ्यांनी सजलेला हा कथासंग्रह. या संग्रहातील सहा कथा ऐतिहासिक आणि दहा संगीत प्रधान आहेत. 
कलावंताचे खाजगी जीवन, लहरीवृत्ती, व्यसनाधीनता, उदारता, कलेवरील निष्ठा, दारिद्र्य, कर्जबाजारीपणा, मानसिक अस्वास्थ्य, कलंदरवृत्ती इत्यादी पैलूंचे दर्शन लेखकाने वेगवेगळ्या कथांतून घडवले आहे. तर ऐतिहासिक कथांपैकी बहुतेक कथांतून शृंगार आणि वीररसाची प्रचिती येते. "वेडात दौडले सात’ या कथेत राज्यासाठी हौतात्म्य पत्करणारा पराक्रमी प्रतापराव आणि त्याच्यावरील निस्सीम प्रेमापोटी प्राणार्पण करणारी निर्मला या दोघांच्या त्यागमय भावजीवनाची नितांतसुंदर कहाणी सांगितली आहे. 

देसाईंच्या कथेचे लक्ष माणसातल्या मूल्यांवर स्थिरावले आहे. सत्य, न्याय, परोपकार, निष्ठा, त्याग, दया, भक्ती इत्यादी मूल्यांच्या जोपासनेमुळे होणारा परिणाम त्यांच्या कथेंत सूचित होताना दिसतो. मग ती व्यक्ती ऐतिहासिक काळातील असो, संगीत क्षेत्रातील असो, ग्रामीण भागातील असो किंवा एखाद्या शहरातील असो. मनाचा ठाव घेणार्‍या कथा.

No comments:

Post a Comment