Monday, 18 April 2016

bari, ranjit desai, kadambari. बारी

Summary of the Book
स्वामी', 'राधेय' सारख्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वाभोवतीच्या कादंबर्‍या लिहिण्याआधी रणजित देसाई ह्यांनी लिहिलेली ही वास्तववादी कादंबरी. आपल्या ह्या पहिल्याच कादंबरीबद्दल कादंबरीच्या प्रारंभीच त्यांनी म्हटले आहे.
कोल्हापूरहून मोटारीने बेळगावला जाताना वाटेवर सुतगट्टी हे गाव लागते. तेथून काकती गावापर्यंतची पंधरावीस मैलांची, अगदी दाट गहिर्‍या जंगलाने वेढलेली वाट सुतगट्टीची, बारी म्हणून ओळखली जाते. भर दुपारीही अंधारून यावे असा हा भाग . ह्या बारीची, त्या जंगलाच्या आसर्‍याने वाढणार्‍या बेरड जमातीची ही कथा आहे. पोटच्या पोराचे हातपाय दुखावले तरी बेरड हळहळणार नाही, पण जंगलातल्या उभ्या झाडावर कुणी अकारण कुर्‍हाड चालवली तर त्याचे डोळे भरून येत असे बेरडांचे त्या जंगलावर, त्या बारीवर प्रेम. आता ते जंगल तसे घनदाट उठले नाही. बदलत्या काळाच्या सुसाट वार्‍याने बेरडांचे जीवनही तसे राहिले नाही. सारे काही बदलून गेले आहे- रुपाने, गुणाने, बैलगाड्यांनी केलेल्या चाकोर्‍यांचे पट्टे घेऊन आजूबाजूच्या जंगलराईने अंगावरच्या लाल धुळीने धुंद झालेली आणि शिट्या किंकाळ्यांनी रात्री-अपरात्री जागी होणारी ही बारी आता तोंडाला डांबर पासून रात्रंदिवस मोटारींची घरघर ऐकून निपचित पडून राहिली आहे- त्या सुनगट्टीच्या बारीची, तिच्या आसर्‍याने वाढणार्‍या बेरड जमातीची ही कहाणी आहे.
आपल्या पुढील लेखकीय वाटचालीत रणजित देसाई ह्यांनी खरे करून दाखविते असे,त्यांच्या ह्या पहिल्याच कादंबरीला प्रस्तावना लिहितांना वि. स. खांडेकर ह्यांनी सांगितलेले सूत्र होते- "स्वत:वर असंतुष्ट असणारा कलावंतच सदैव प्रगती करू शकतो."

No comments:

Post a Comment