Tuesday, 19 April 2016

Bhokarwaditil Rasvantigruha By: D M Mirasdar In: Katha sangrah, vinodi, marathi

दुकानदारीची सदोबाची काय कल्पना होती कोण जाणे ! गिर्‍हाईक वाढवण्यासाठी नित्य काही करावे लागते, निरनिराळ्या योजना आखाव्या लागतात, दुकानाची आकर्षक सजावट करावी लागते, या गोष्टी त्यांच्या गावीही नव्हत्या. अर्थात हा त्यांचा दोष नव्हता. गावचे वातावरणच तसे होते. सगळेच दुकानदार एकाच छापातले गणपती होते, दुकान मांडून बसायचे, गिर्‍हाईक आले तर सौदा करायचा, नाही आले तर निवांत बसायचे. मुद्दाम कसलीही हालचाल करायची नाही, अशीच एकूण पद्धत होती. आधुनिक विक्रीकलेचा गंधही त्या काळात गावाला नव्हता. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. भरभराटीची आणि सुबत्तेची काही वर्षे संपली. गिर्‍हाईक कमीकमी होत गेले. फार हाल झाले त्यांचे ... शेवटी सदोबा नेवासकर अन्नान्न करत मेला !

No comments:

Post a Comment