Monday, 18 April 2016

KAMODINI, RANJIT DESAI, KATHA SANGRAH

Summary of the Book
कमोदिनी' हा रणजित देसाई यांच्या दहा कथांचा संग्रह. मानवी जीवनात प्रेम ही एक महत्त्वाची भावना आहे. दोन व्यक्तींमध्ये काय नाते आहे त्याप्रमाणे या प्रेमाचे स्वरूप बदलते. पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, गुरू-शिष्या अशा संबंधातच नाही, तर कोठीवर जाऊन प्रेम करण्याच्या संबंधातसुद्धा प्रेमाचे वेगवेगळे कंगोरे दिसतात. या संग्रहातील बहुतेक कथा विविध घटनांमधून या भावनेचा शोध घेणार्‍या आहेत. कथेतील पात्रांच्या प्रभावी चित्रणातूनदेखील मानवी भावनांचा वेध घेता येतो. 'अखेर' या कथेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उत्कट देशभक्तीचा घेतलेला मागोवा हे याचेच उदाहरण आहे.

No comments:

Post a Comment